आप्पाजीचा कामठा


                                बऱ्याच दिवसांपासून माझे नि दादाचे आमच्या लहानपणाच्या विषयांवर गप्पा रंगत होत्या . आम्ही कसे होतो किंवा आम्ही काय काय खोडकरपणा केला , हे आईपण मधे मधे सांगू लागली .खरं तर त्या गोष्टी ऐकून ते चित्र डोळ्यासमोर येऊन थबकले . आणि लगेच आपण ह्या गोष्टी लिहाव्या आणि परत जुन्या आठवणींना उजाळा द्यावा असे कुठे तरी मनात वाटले . आणि आठवला आप्पाजी चा कामठा (काम करण्याची खोली त्याला आम्ही कामठा असे म्हणत असे) . हा कामठा आम्हा भावंडासाठी तिजोरी होती आणि त्या तिजोरीचे मालक होते स्वतः आमचे आप्पाजी. खाऊसाठी पैसे आईकडून मिळायचे नाही तेव्हा आमच्यासाठी तो शेवटचा पर्याय असायचा कामठा आणि तिथून आम्ही कधी निराश होऊन बाहेर पडलो नाही किंवा तशी वेळ आम्ही आणली नाही . कारण पैसे आम्ही घेणार म्हणजे घेणारच हट्टीपणा (आता तो हट्टीपणा नाहीये) शेवटी , म्हणून आप्पाजीही  वैतागून आम्हाला पैसे देत असे . आप्पाजींची एक खुबी म्हणजे आम्हा चौघांमधले गोड व्यवहार हे आईला कळायचे नाही , त्याची आप्पाजी नेहमी दखल घेत असे . जरी आईला याची भनक लागली तरी आमची ढाल म्हणजेच आप्पाजी सदैव आमच्या सोबत असायचे . आम्हाला लागेल ती वस्तू न मागताच आमच्या हातात असायची .


                                                       
                            ह्या कामठ्यामध्ये आप्पाजी आपले सुतार काम करीत असे ,  लाकडाच्या नक्षीदार असे टेबले खुर्च्या आणि अजून बऱ्याच गोष्टी ते आपल्या स्वतःच्या हाताने बनवायचे , विशेषतः म्हणजे त्यांना त्यामधून आनंद मिळत असे . त्यांच्या कामामुळे ते प्रसिद्ध हि तेवढेच होते . त्यामुळे आमची मज्जाच . त्यावेळी व्यवहारही  खूप सोपे आणि खरेखुरे असायचे  , पैशांची  देवाणघेवाण  कमी आणि धान्यांची (किंवा ज्यांना जे जमेल ते  ) देवाणघेवाण जास्त राहायची . खरी मज्जा तर तेव्हा  यायची जेव्हा ठरलेल्या रविवारी  कामठ्याची साफसफाई करायचो . त्यासाठी आम्ही तिघेही भावंड सज्ज असायचो आणि  साफसफाईच्यावेळी आई बाबा किंवा स्वतः आप्पाजीनां  पण आम्ही आत घेत नव्हतो कारण होते ते सापडणारे १ , २ , ५ आणि १० रुपयांच्या नोटा . ह्या नोटा आप्पाजींना पण लक्षात राहत नव्हत्या  (असे आम्हाला वाटायचे ). आमचा पुर्ण दिवस त्या कामठ्यामध्ये जायचा आणि आप्पाजींचे हरवलेले पैसे आम्ही गोळा करत असो .आप्पाजींचे पैसे कधी ,केव्हा हरवले नि कसे हे त्यांच्या लक्षात नेहमी राहायचे मात्र आम्हाला याची थोडीही कल्पना नसायची . सगळे आवरून झाल्यानंतर आम्ही मोठ्या उत्साहात त्यांना सांगायचो कि आप्पाजी तुमचा कामठा आम्ही आवरला , कौतुक व्हायचं त्यात शंका नसायची पण .......

आप्पाजी : काय रे सोन्या (दादू ) ह्या टेबलाच्या खाली ५ रुपयाची नोट पडली होती साफसफाई करताना दिसली असेल ना तुला  .....  "झालं म्हणजे यांना माहिती होते की पैसे खाली पडले होते ते ". त्यावर आम्ही तिघे हि हो आप्पाजी तेच हे आणि हो आप्पाजी हे त्या लाकड्याच्या घोळक्यात सापडले .... असे करून आम्ही सगळे पैसे त्यांना देऊन देत असो .
                                        जरी त्यांना पैसे लक्षात नसेले  तरी  आमची मधली ताई (मन्या) आनंदाच्या भरात सगळे आप्पाजीला सांगून द्यायची .तेव्हा खरे तर निरागसपणा बोलायचा  .  शिवाय तिला शाबासकी सुध्दा मिळायची . मात्र माझं तस नव्हते शेवटी शेंडेफळ ना .  हे सगळे झाल्यांनतर तिघांना शाबासकी आणि सोबतच नवीन नवीन खाऊ सुध्दा मिळायचा ..... तोच आमच्यासाठी ५ स्टार ची मेजवानी असायची ...........


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कैद...

मी , तो आणि समुद्र .....

मैत्रीचे प्रेम...