Posts

मैत्री.....

सहवासातून होते ती मैत्री अनुभवाने घट्ट होते ती मैत्री वाद विवादाने प्रेमळ होते ती मैत्री नको असलेल्या जोक्स वर हसते ती  मैत्री रक्तापलीकडले नाते म्हणजे मैत्री समजायला कठिन पण उमजायला सोपे ती मैत्री दुःखात खरी ठरते  ती मैत्री सुखात आपुलकी दाखवते  ती  मैत्री !

तो...

सतत माझ्या बोलण्यावर तो फ़क्त हसायचा काही बोल म्हटले तर  एक स्मित हास्य देऊन बघत रहायचा  कधी चुप झाली तर तो अस्वस्त व्हायचा  डोळ्यांआड़ गेली तर शोधत राहायचा  भेटण्याआधी झालेली  त्याची धुसमुस कळायची मला  बघता क्षणी आलेला  त्याच्या चेहऱ्यावर तेज  बघून मनात चालले विचार लगेच  आपली वाट परतून  जायची 

नजरेस पडला..

ती हळूच सगळ्यां समोर येऊन बसली नि तिचा लाल झालेला चेहरा त्याच्या नजरेस पडला प्रथम झालेली भेट बघता क्षणी तो तिच्या प्रेमात पडला थेट  शब्दाने नाही तर नजरेने बोलणे सुरु झाले  बोलणार कसे ना सगळ्यांचे डोळे त्यांच्यावर टिपलेले सभोवताल एक वेगळीच शांतता पसरली हळुवार डोळ्यांना डोळे भिडले तिने लाजुन वरती पाहिले तो फ़क्त तिलाच बघत होता व्याकुळ  झालेले ते मन नाही राहिले कश्याचेच  भान   

उजाड़ा...

आज बऱ्याच दिवसांनी मैत्रीला उजाड़ा मिळाला नकळत जुन्या गोष्टी नविन स्वरुपात निघाल्या जीवाभावाची नाती अजुनच घट्ट होताना दिसल्या शब्द तसे अर्थ निघाले भावना तसे मन जुळले विचाराला नविन दिशा मिळाली बघता बघता हवेत टाळ्यांचा सुर गवसला 

स्वप्न....

हळूच पापणीवरची स्वप्ने साक्षात होताना दिसले नाही म्हटले हे वेडे मन तरी प्रेमात पडावेसे वाटले नकळत गालांवर गोड लाली येऊन डोळ्यांमधे नविन स्वप्नांचा जन्म झाला आरश्यामधे पाहून माझाच मला प्रश्न पडला आज माझ्याच स्मित हास्यामधे वेगळेपण दिसून  आले नि हृदयाची स्पंदने तर  कधीच परकी झाले 

जीवनाचे रंग.......................

जीवनाचे रंग वेगळे नानापरिने अनुभवले कधी मैत्री तर कधी प्रेम कधी हसु तर कधी अश्रु कधी सावली तर कधी उन्ह मनाच्या या आंतरगाभाऱ्यामधले कोणाला कधी दीसलेच नाही चेहऱ्यावर होते हसु मात्र डोळ्यात त्या भावनेचे होते आसु मन पण काय असते नाहीं माहिती असते ते आपले नाही तरी भेटण्याची हाव बागळताहेत स्वप्नातील परी नि राज्याची कहानी आज खोटी वाटायला लागली मुर्ख होते ते मन वेडे होते ते मन नाही त्या जगात आपली जागा करू पाहतो आहे नि मी मात्र स्तब्धतेने पाहते आहे    

आयुष्याच्या वरणावर........................

आयुष्याच्या वरणावर खुप भेटता  पण आठवणीत मात्र आपलेच राहतात  मैत्री ही करता येत नाही तर  ती एका पाण्यावरच्या  दवबिंदु प्रमाणे हळूच होऊन जाते  मैत्रीची गाणी गाताना हरवुन जातो आपल्याच जगात  मग कोणास ठाऊक का सोडून जातात  तो कॉलेज चा पहिला दिवस नि मिळवलेला तो पहिला हात  का बरे  सुटतात कॉलेज संपल्यावर  " म्हणतात की        मैत्री चंदनाप्रमाणे हवी       नेहमी सुगंध देणारी " का बर तोच सुगंध नकोसा वाटतो  असो पण जीवनात मैत्री नावाचा रस्ता हवाच