Posts

भातुकलीचा खेळ .....

ह्या अबोल्यामध्ये एक वेगळेच प्रेम दडले नाव तुझे आयुष्यभर माझ्या हृदयात कोरले तू बोल अथवा नको बोलूस तुझे डोळे नि श्वास सगळे काही सांगून जात आहे रागात पण खुप गोड दिसणारा तु तुझ्या स्मित हास्याची थोडी कमी आहे जेवढा लांब जाण्याचा तुझा प्रयन्त असेल तेवढा तुझा पाठलाग मी करत राहील जेवढी फिरवशील पाठ तू तेवढे तुझ्या समोर येऊन उभी राहील प्रेम केले आहे मी तुझ्यावर असे कसे बरे कमी होईल लाख प्रयन्त कर मला विसरण्याचा मी बरे विसरू देईल नको ती सोडून जाण्याची भाषा आपल्यात हवे तर भांड किंवा रागाव रे तू माझ्या वर  कळतंय मला व्यथा तुझ्या मनाची प्रेम तुझे खुप आहे माझ्यावर नको मला तो आठवणीतला पाऊस नि ऊन सावलीचा खेळ आता खरी वेळ आलीये खेळायचा तो भातुकलीचा खेळ 

अव्यक्त प्रेम....

स्वप्नात जरी तू असलास तरी  स्वप्न ते फक्त माझे आहे जरी मनात  नाही मी  तुझ्या मात्र माझ्या या हृदयात तुझंच राज्य आहे ओठांवर नसेल शब्द प्रेम व्यक्त करण्यासाठी पण मनात तुझ्याच नावाची कविता चालू आहे जागत राहते हल्ली तुझ्या आठवणीत आणि रमत असते त्या तारेच्या विश्वात कारण आठवते मज , कधी काळी मोजली होती मी त्यांना तुझ्या सहवासात हरवून बसते कधी कधी त्या समुद्रा काठी का तर माझ्या प्रेमाची शब्द उमटली होती त्या चिंब वाळूवरती स्वतःच स्वतःला देत दिलासा रेखाटू लागली सप्तर्षी रंगाचा सूर तो त्या बेधुंद इंद्रधनुष्यावरती उजळलेल्या त्या अनंत निशब्दांचा थवा आणि साथ लाभली ती दरवळणाऱ्या प्रेमाच्या सुगंधाची खरच किती हा गोड लपाछपीचा अनुभव , नि आनंद वाटतो तो अव्यक्त झालेल्या प्रेमाची 

कॉलेज ची डायरी

आता मात्र कॉलेजच्या डायरी मध्ये रोजचे किस्से लिहिणे कमी होणार रोजचा आमचा कँटिंग चा टेबल आता रिकामा दिसत जाणार तू असे केले होते , तू तसे केले होते हा गोड वादविवाद आता नाहीसा होणार शेवटच्या घटकेला असाइनमेंटची देवाण घेवाण करणे आता थांबवल्या जाणार लायब्ररीत रात्रं दिवस घालवून अभ्यास कमी नि झोप जास्त हे कुठे तरी हरवल्यागत होणार पेपर संपल्या नंतर होणारा आनंद नि एकदुसऱ्यां मध्ये होणारे अंतर हे चित्र दिसणे बंद होणार एकाच डब्यात जेवण करताना शेवटचा घास कोणाला मिळणार याचे तर्क वितर्क थांबणार भर पावसात एकाच छत्रीत सगळे येऊन अर्धवट भिजणे हे आता इतिहासात जमा होणार  

एकतर्फी प्रेम....

तुझी सवय होऊ नये म्हणून सतत तुला टाळत असते .... कारण प्रेम  माझे एकतर्फी म्हणून तुझ्याकडे ओढल्या जाते ..... तुला चोर नजरेने बघून तुझाच चेहरा वाचण्याचा माझा प्रयत्न चालू असते...... ओठांवर हसू तुझ्या आणि मी मात्र गालातल्या गालात लाजून जाते ....... तुझं पण मन माझ्यासाठी झुरत का ? हा एकच प्रश्न सतावत राहतो ...... नि डोळ्यांचा परदा अलगद उघडून "वेडे एकतर्फी प्रेम ना तुझे "हे सांगून जातो ...... दिसताच तू अबोल झाल्यासारखे वाटते  .... जाताच तू काही हरवले असे जाणून येते .... रोज तुझ्या वळणावर डोळे टिपून बसले असते.... आज तुला उमजणार माझे प्रेम हि आशा उराशी जपत असते .....

नेमकं प्रेम कि मैत्री ...

नेमकं प्रेम कि मैत्री या प्रश्नावर येऊन थांबते गुंतलेले  हे मन काही केल्या माघार घेत नव्हते दचकून पाय अडखळावे  तसे माझ्या या विचाराचे व्हायचे चौफेर पसरलेल्या त्या तिमारामधून अलगद आशेची छवी दिसल्यागत व्हायचे आज ओंजळीमधील फुले रोजच्या पेक्षा जास्त सुगंध पसरवू लागली नाही म्हणता म्हणता मी तुझ्यात हळुवार पणे गुंतत चालली  शोधू लागली नवी नवी कारणे रोज तुझ्याशी बोलण्यासाठी रमून जाते तासंतास आजकाल तू न केलेल्या गप्पांमधी न चुकता ,न विसरता, हल्ली मी तुझ्याच बद्दल बडबडत राहते प्रत्येक्षात काय तर स्वप्नात सुद्धा तुझ्याच प्रेमाचे गुणगान गात राहते

हुंदके...

हल्ली काही लिहावसे वाटत नाहि रे कारण तुझ्या त्या आठवणी हुंदके देत बाहेर पडतात अश्रु ही कोरडे पडून फ़क़त त्यांची निशानी ठेऊन जातात तू येशील  माझे अश्रु अलगद पूसशील या आशेने पापण्या बंद होतात हसुन जी खळी गालावर यायची आज ती तू नसण्याने नाहीशी होत जातात खरच हल्ली काही लिहावसे वाटत नाहि रे......... .

वहीचे पान ....

जश्या जश्या मनात साठत जातात आठवणी तुझ्या तसे तसे पाने भरत  जातात वहीच्या माझ्या शब्द ओठांवरची अलगद सुरेख अक्षरात रेखाटली जातात बघता बघता एकामागे  एक पाने भरू लागतात हळूच भरलेल्या पानांची रंग बदलत जातात तसेच नवीन जुन्या आठवणी जाग्या होतात तुझ्याबद्दल लिहायला शब्द अपुरे नाही रे पडत पण काही भावनांना कागदावर नाही ना उतरवता येत काही काळात वही तर भरून जाते मात्र भावनांचा गंध ओलसरच राहते