बऱ्याच दिवसांपासून माझे नि दादाचे आमच्या लहानपणाच्या विषयांवर गप्पा रंगत होत्या . आम्ही कसे होतो किंवा आम्ही काय काय खोडकरपणा केला , हे आईपण मधे मधे सांगू लागली .खरं तर त्या गोष्टी ऐकून ते चित्र डोळ्यासमोर येऊन थबकले . आणि लगेच आपण ह्या गोष्टी लिहाव्या आणि परत जुन्या आठवणींना उजाळा द्यावा असे कुठे तरी मनात वाटले . आणि आठवला आप्पाजी चा कामठा (काम करण्याची खोली त्याला आम्ही कामठा असे म्हणत असे) . हा कामठा आम्हा भावंडासाठी तिजोरी होती आणि त्या तिजोरीचे मालक होते स्वतः आमचे आप्पाजी. खाऊसाठी पैसे आईकडून मिळायचे नाही तेव्हा आमच्यासाठी तो शेवटचा पर्याय असायचा कामठा आणि तिथून आम्ही कधी निराश होऊन बाहेर पडलो नाही किंवा तशी वेळ आम्ही आणली नाही . कारण पैसे आम्ही घेणार म्हणजे घेणारच हट्टीपणा (आता तो हट्टीपणा नाहीये) शेवटी , म्हणून आप्पाजीही वैतागून आम्हाला पैसे देत असे . आप्पाजींची एक खुबी म्हणजे आम्हा चौघांमधले गोड व्यवहार हे आईला कळायचे नाही , त्याची आप्पाजी...