सांजवेळ झाली एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत होता तर दुसरीकडे तिचे डोळे पाणावले होते . मधेमधे विजा कडकडत होत्या नि त्याच्या प्रकाशाने तिचे ते अश्रू मोत्याच्या मणीप्रमाणे चमकू लागली . एका हातात डायरी तर एका हातात पेन , मन भरून आले , डोक्यामध्ये हजारो प्रश्न रेंगाळत होती. बाल्कनीमध्ये बसल्यामुळे पावसाच्या सरी तिला स्पर्श करू बघत होत्या , हवेचे गार झुळूक तिला धक्का मारून आपली वाट काढत होते , क्षणार्थात मोगऱ्याचा सुगंध दरवळू लागला . नाही म्हणता म्हणता तिचे अश्रू अनावर झालेत आणि ती हळूहळू हुंदके देत ती डायरी वाचू लागली . जुनी डायरी आणि...... तिचे प्रेम याचे combination म्हणजे तिचे लिखाण आणि त्याची शब्द . आवडत नव्हते तिला लिहायला मात्र त्याच्यामुळे ती लिहायला लागली होती .गाणी ,कविता , चारोळी , शायरी हे सगळे त्याच्याकडून ती शिकली होती . भावना व्यक्त करू लागली होती . डायरीचे पाने ती एकापाठोपाठ वाचू लागली......."आज त्याची नि तिची भेट झाली . थोडा आगाऊ पण मनाने चांगला वाटत होता , (त्याच्या स्वप्नात रंगून) त्याच्या खोडकर स्वभावामुळे कदाचित ती त