Posts

Showing posts from 2021

सासर ...

 अलक : तिच्या मनाची झालेली घालमेल बघून  त्यानेच त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊ टाकले  कारण सासरी जाणारी प्रत्येक मुलगी राजवाड्यात मोठी झालेली नसते,  हे त्याला चांगलेच ठाऊक होते............

मैत्रीचे प्रेम...

मैत्रीचे प्रेम हे कधी पलीकडे गेले याचे भान हि मला राहिले नव्हते  मात्र मला हे कधीच पटवून देता आले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही अश्रू तुझ्या डोळ्यात असायचे  मात्र मन माझे हळवे व्हायचे  झालेला हळवेपणा मला कधी दाखवताच आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही  कित्येक आठवणी साठवून ठेवल्या ,  प्रत्येक आठवणी लिहून ठेवल्या मात्र त्या कधी तुझ्या समोर मांडता आले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही बघताच तुला मन फुलून यायचं , सगळी कडे  आपला सुवास पसरून बेभान करायचं  त्या फुलांचा सुगंध तुला देताच आले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही  नकळत तुझ्याशी तासंतास बोलायची ,  दाटलेल्या भावनांशी झुंज माझी चालायची  ओठांवरचे शब्द तुझ्या कानापर्यंत पोहचवता आले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही  होताच तुझा स्पर्श मला , थोडी लाजून जायची मी शहारलेल्या हात मग अलगद तुझ्या कडे सरकवयाची बिनधास्त तुझ्या मिठीत यायला मला कधी जमले नाही  कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही