मी , तो आणि समुद्र ..... 3

निल त्याच्या घरी पोहचतो.तिच्याच विचारात तो मग्न झालेला असतो तेच क्षणर्थात त्याला चक्कर येऊन तो खाली कोसळतो आणि बेशुद्ध होतो . निलच्या घरचे गोंधळलेल्या अवस्थेत डॉक्टरला बोलावून त्याची तपासणी करतात , आणि घरच्यांसमोर गंभीर असे सत्य बाहेर येते . हल्ली रोज निल स्वतः या दुःखांमध्ये सतत अस्वस्थ असायचा , कारण घरच्या लोकांकडे त्याला द्यायला असा वेळच नसायचा .म्हणून कोणालाही न सांगता तो हे दुःख सहन करत होता , हे घरच्यांना कळताच सगळे घर हादरून जात . पण निल खंबीर होऊन सगळ्यांना सांभाळतो . तेवढ्यात डॉक्टर बोलतात निलकडे खुप कमी वेळ आहे साधारणतः १ ते २ महिने . तेवढ्यात निल खचून जातो , त्याच्या डोळ्यांसमोर लगेच सई चा चेहरा येतो . त्याचे वचने , त्याचे प्रेम , घालवलेले ते क्षण त्याच्या पुढे येऊन पावसाच्या सरी सारखे बरसु लागतात . ...