मी , तो आणि समुद्र ..... 2
त्या दोघी आता किनाऱ्याच्या दिशेने धावू लागल्या. सई अंतरा ला खेचून समुद्राच्या दिशेने घेऊन जात होती . रोजच्या जागेवर सई आणि अंतरा येऊन बसल्या आणि गप्पा करू लागल्या . अर्धा तास झालेला मात्र निलचा अजून पर्यन्त पत्ता नव्हता . तीचा उत्साह आता रागात रूपांतर करून गेला . कुठेय हा , आला का नाही , मुद्दाम तर नसेल ना आला , पण आज काय झाले असेल?.......त्याला काही झाले तर नसेल ....(नाही नाही असे मनात ती पुटपुटली ). आता तिचा राग त्याच्या काळजीमध्ये बदले होते . ती व्याकुळ होऊ लागली , नानाप्रकारचे विचाराने तिचे मन भरून आले , १तास उलटून गेला होता . एव्हाना तो येऊन जातो मग आज काय झाले (सई अंतरा ला सांगत)? आज ती निराश झाली होती एकूण ४५ दिवसांमध्ये हे पहिल्यांदा घडले होते सई आणि निलची भेट झाली नव्हती . सई अंतरा ला म्हणत ....ऐकना!तू जा घरी मी थांबते थोड्यावेळ इथे, कदाचित तो आला नि मी इथे नसेल तर तो गोंधळून जाईल . अंतरा तिला विनवणी करू लागली नको तू चल आपण घरी जाऊन यावर बोलू . सई काही केल्या ऐकत नव्हती,शेवटी अंतरा तिथून निघून गेली . ...