साखळी.....
नकळत आपल्यात एक नाते झाले अतूट अशी सुंदर मैत्री झाली कधी वादाने तिखट तर कधी प्रेमाने गोड होऊ लागली त्यात तुझा तो न झालेल्या सवांदामुळे रुसवा तर कधी समजुतीने माझी बाजू घेऊन घालवायची माझ्यातला रुसवा हळू हळू सांगू लागले गोष्टी माझ्या मनातल्या तुला त्यावर दिसू लागले साखळी आपल्यातल्या बंधनाची दिवसा मागे दिवस उलटले तसेच मैत्रीला आपल्या दिशा उमजू लागली अशीच राहावी तुझी नि माझी मैत्रीची जोडी देवा कडे अशी प्रार्थना केली आयुष्याच्या वळणावर मिळतील खूप मित्र तुला पण मला विसरणार नाही याची खात्री आहे मला ......