कोणी आलेच कुठे?....
मन मोकळ करू तरी कोणाजवळ कारण माझी म्हणणारी माणसं आता उरलीच कुठे अश्रू डोळ्यांमधून गालावर येऊन सुकून जातात मात्र ते पुसायला कोणाचा हात पुढे आलाच कुठे मनाच्या या युद्धात सगळ्या अशा आकांक्षा मरण पावत चालली कारण माझ्याकडून युद्ध लढायला कोणी आलेच कुठे अख्खा दिवस सरत जातो रात्र ही तिची तिची निघून जाते मात्र माझ्यासोबत थांबायला कोणी आलेच कुठे वसंता सारखी माझी पालवी गळून पडू लागली नवी येणार कि नाही हे माहिती नाही कारण त्याला पाणी घालायला कोणी आलेच कुठे